Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरताना शेतकऱ्यांची तारांबळ

Amravati Crop Insurance : पीकविमा योजनेचे पोर्टल संथ झाले आहे. परिणामी, प्रत्येक केंद्रावर येत असलेल्या २०० अर्जांपैकी केवळ २५ ते ३० च्या जवळपास अर्ज अपलोड होऊ लागल्याने उर्वरित शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ लागला आहे.

Team Agrowon

Amravati News : पीकविमा योजनेचे पोर्टल संथ झाले आहे. परिणामी, प्रत्येक केंद्रावर येत असलेल्या २०० अर्जांपैकी केवळ २५ ते ३० च्या जवळपास अर्ज अपलोड होऊ लागल्याने उर्वरित शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ लागला आहे.

एक रुपया प्रीमियम भरून पीकविम्याची सोय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रारंभी या योजनेकडे शेतकऱ्यांनी पूर्वानुभव बघता पाठ फिरवली होती. मात्र नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान होऊ लागल्याने विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागल्याचे चित्र सीएससी केंद्रांवर बघायला मिळू लागले आहे.

अशातच केंद्रांची संख्याही वाढल्याने पोर्टलवरील भार वाढला आहे. गत आठवड्यात पोर्टल काही दिवस बंद पडले होते. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २३ हजार ४६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून २ लाख ८७ हजार १४९ हेक्टर क्षेत्र (४३ टक्के) विमा संरक्षित झाले आहे.

पीकविमा भरण्यासाठी सीएससी केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. नोंद घेण्याची व अर्ज अपलोड करण्याची पोर्टलची क्षमता कमी होऊ लागली आहे. एका अर्जासाठी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे २०० शेतकरी संख्या असलेल्या केंद्रांवरून एका दिवसांत केवळ २५ अर्ज दाखल होत आहेत.

तीन दिवसांची मुदत बाकी

३१ जुलै ही पीकविमा काढण्याची अंतिम मुदत आहे. त्या मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे. अशातच विमा पोर्टलवर अर्ज अपलोड होण्याची गती मंदावल्याने नवीन संकट उभे झाले आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या ८० टक्के क्षेत्र विमा संरक्षित करण्याचा लक्ष्यांक कृषी विभागासमोर आहे. पोर्टलची स्थिती बघता हे आव्हान मुदतीत पेलणे कठीण असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT