Farmer Protest Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Tower : वीज मनोऱ्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले

Farmer Protest : शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर महापारेषणचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. भुजबळ तसेच कुरसंगे हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मनोरा परिसरात आले.

Team Agrowon

Pune News : पाबळ (ता. शिरूर) येथे शेतकऱ्यांनी वीज मनोऱ्याचे काम आंदोलन करून बंद पाडले. या आंदोलनाची महापारेषणने दखल घेत थेट बांधावरच सोमवारी (ता. १०) बैठक घेतली व प्रकल्पाच्या माहितीसह नुकसान भरपाईबद्दलचे शासनाचे धोरण स्पष्ट केले.

या वेळी बाधितांच्या नुकसान भरपाईबाबतची निर्णायक बैठक प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्याकडे घेण्याचे अधीक्षक अभियंता प्रकाश कुरसंगे जाहीर केले.

शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर महापारेषणचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. भुजबळ तसेच कुरसंगे हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मनोरा परिसरात आले. जमलेल्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

दरम्यान, नुकसान भरपाई ही समृद्धी महामार्गाप्रमाणे द्यावी, कारण टॉवर हे तहहयात शेतकऱ्यांच्या शेतात उभे असणार असल्याचे भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगताच याबाबत प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्यासमवेत तत्काळ बैठक घेऊ, असे कुरसंगे यांनी सांगितले. तेथूनच किसवे यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हा प्रश्‍न मिटविला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी माजी सरपंच सोपान जाधव, थिटेवाडी आंदोलनाचे प्रमुख परमेश्वर चौधरी, बाधित शेतकरी राहुल चौधरी, कल्पेश चौधरी, किशोर डहाळे, काळूराम चौधरी, संपत चौधरी, हेमंत चौधरी, बाळासाहेब चौधरी, संजय चौधरी, प्रवीण चौधरी, बाळू जाधव, संतोष चौधरी व राजाराम शिरोळे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT