Dudgaon News  Agrowon
ताज्या बातम्या

Dudgaon News : दुडगावातील शेतकरी मुलगा बनला वनपरिक्षेत्र अधिकारी

एका वर्षात ‘एमपीएससी’त दोन वेळा उत्तीर्ण

Team Agrowon

Nashik News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यात दुडगाव (ता. नाशिक) येथील नीलेश चव्हाण याने (वय २७) (Nilesh Chavan) वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विशेषतः तो एका वर्षात एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून दोन वेळा उत्तीर्ण झाला आहे.

नाशिक तालुक्यातील महिरावणीजवळील एक हजार लोकसंख्या असलेल्या दुडगाव या आदिवासी बहुल गावातील शेतकरी शरद चव्हाण यांचा नीलेश मुलगा आहे.

आयटी इंजिनिअरिंग केलेल्या नीलेश याने २०२१ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेत राज्‍यात ओबीसी प्रवर्गातून पाचवा क्रमांक, तर महाराष्ट्रात २५ वा क्रमांक पटकाविला आहे. त्याचा हा प्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

दुडगाव येथील ग्रामस्थांनी नीलेश याची मिरवणूक काढत नागरी सत्कार केला. या वेळी माजी महापौर दशरथ पाटील, विलास शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे, मुरलीधर पाटील, दिनकर आढाव, करण गायकर, विष्णुपंत म्हैसधुणे, नयना घोलप, संपत सकाळे, गोपाळराव पाटील, बाजीराव भागवत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

नीलेश याने २०२० मध्ये एमपीएससी परीक्षा दिली असता, त्यातही त्याने राज्य कर निरीक्षक या पदाला गवसणी घातली होती. २०२१ मध्येहीही यश मिळवीत त्याने वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

नीलेश याने प्राथमिक शिक्षण दुडगावात, माध्यमिक शिक्षण कोपरगाव येथील जंगली महाराज आश्रमात घेतले तर, बारामती येथून बीएस्सी ॲग्री बायोटेकची पदवी घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT