Reshim Sheti  Agrowon
ताज्या बातम्या

Sericulture : शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे

Reshim Sheti : बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारणावर भर द्यावा, तसेच फायदेशीर अशा रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

Team Agrowon

Jalna News : बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारणावर भर द्यावा, तसेच फायदेशीर अशा रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे कृषी विज्ञान मंडलाच्या ३११ व्या मासिक चर्चासत्राचे आयोजन बुधवारी (ता. ५) करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषिभूषण भगवानराव काळे उपस्थित होते.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, डॉ. एम. बी. पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गेल्या महिन्यात राज्य व देशपातळीवर विविध पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचा व गावाचा सत्कार करण्यात आला.

यात कडेगाव (ता. बदनापूर) ग्रामपंचायतीस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या श्रेणीत राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर रेवगाव (ता. जालना) येथील अनिल पाखरे यांना २०२३ चा वसंतराव नाईक पर्यावरण पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

डॉ. राठोड म्हणाले, की शासन स्तरावर रेशीम शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल सर्वांच्या सहकार्याने जालना जिल्ह्याला रेशिमची राजधानी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

कृषिभूषण काळे म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यात येत असून, विद्यापीठांनी विकसित केलेले विविध प्रकारचे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे. तत्पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन व व्यवस्थापन या विषयावर डॉ. एस. बी. पवार यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज 

Farm Loan Waiver: कर्जमाफीबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत, पण नियमित कर्जदारांनाही दिलासा मिळावा- अजित नवले

Power Theft Cases: तीन महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्या पकडल्या

Pending Works: प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : खासदार डॉ. कल्याण काळे

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT