Gokul Milk Rate agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk Rate : गाय दूध दर पूर्ववत करा अन्यथा..., 'गोकुळ'च्या दारात शेतकऱ्यांचा मोर्चा; अध्यक्षांची सावध भूमिका

Arun Dongale : गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगंळे यांनी बाजारपेठेतील परिस्थीनुसारच दर कमी केल्‍याचे सांगितले.

sandeep Shirguppe

Kolhapur District Cooperative Milk : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने गाय दूध दरात कपात केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा काढून दूध दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जर संघाने दूध कपात मागे घेतली नाही तर आम्ही अन्य दूध संघाना दूध घालू असा पवित्रा उत्पादकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

गोकुळ ही मातृसंस्था आहे. ही संस्था टिकावी म्हणून हक्कासाठी मोर्चा काढला आहे. तात्काळ दर पूर्ववत केले नाही तर आमच्याकडे दुसरे पर्याय खुले असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला.

आम्‍ही दूध उत्पादकांची मागणी संचालक मंडळापुढे ठेवू असे आश्‍वासन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दूध उत्पादकांना दिले. गोकुळने दोन दिवसांपूर्वीच गायीच्या खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांनी कपात केली होती. या विरोधात जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. अनेक ग्रामस्थांनी निदर्शने करत या दरवाढीविरोधात आवाज उठवला होता. मंगळवारी(ता.३) करवीर तालुक्‍यातील दूध उत्पादकांनी संघावर मोर्चा काढला.

अलीकडच्या काळात दुग्ध व्यवयाय करणे आव्‍हानात्मक बनले आहे. यातच संघाने गायीच्या दुधाचे दर कमी केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. संघाने दरवाढ मागे घेतली नाही तर अन्य संघांना दूध घालू असा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला. अध्यक्ष डोंगंळे यांनी बाजारपेठेतील परिस्थीनुसारच दर कमी केल्‍याचे सांगितले.

म्हशीच्या दुधाला मागणी असल्याने आम्ही म्हशीच्या दुधाच्या दरात तातडीने वाढ केली. परंतू गायीच्या दुधाबाबत विपरित परिस्‍थिती आहे. खासगी दूध संघांनीही दुधाच्या किंमती कमी केल्या आहेत. काही संघ येथून पुढील काळात दर कमी करण्‍याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी केलेली ही मागणी संचालक मंडळापुढे ठेवू असे आश्वासन चेअरमन डोंगळे यांनी दूध उत्पादकांना दिले. मोर्चात करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, विष्णू राऊत, रंगराव बचाटे आदिसह दूध उत्पादक सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT