Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचा बेमुदत ‘ठिय्या’

Electricity Connection : तीन वर्षांपूर्वी अनामत रक्‍कमेचा भरणा करूनही कृषीपंपाला वीज जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

Team Agrowon

Gadchiroli News : तीन वर्षांपूर्वी अनामत रक्‍कमेचा भरणा करूनही कृषीपंपाला वीज जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. असा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवार (ता.६) पासून येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

हमखास पावसाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत गेल्या काही वर्षात पाऊसमान अनिश्चित झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी वैयक्‍तिक सिंचनाचे स्रोत बळकटीकरणावर भर देत आहेत.

त्याकरिता त्यांना विजेची गरज भासते. अशाच शेकडो शेतकऱ्यांनी दोन ते तीन वर्षांपूर्वी डिमांड रक्‍कमेचा भरणा महावितरणकडे केला. परंतु तीन वर्षांपासून त्यांना वीज जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याप्रकरणी वारंवार निवेदन देखील देण्यात आली.

या निवेदनाची वरिष्ठ अधिकारीस्तरावर कोणतीच दखल घेण्यात आली नाही. अखेरीस त्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवार (ता.६) पासून महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी पांडुरंग देशमुख, राजू गडपायले, मारोती मोहुर्ली, नामदेव चलाख, प्रकाश गावतुरे, नीळकंठ लंदाकेकर, आकाश मट्टामी, शामदेव गावतुरे, तुळशीराम गावतुरे, पुंडलिक चौधरी, ज्ञानेश्‍वर वाठणकर, सुरेश भांडेकर, मुरलीधर धकाते उपस्थित होते.

आता करणार घंटानाद

ठिय्या आंदोलनाची दखल घेत तत्काळ वीज जोडणी न दिल्यास मंगळवार (ता.११) पासून घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच परिषदेचे योगाजी कुडवे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT