Sangli DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Sangli DCC Bank : शेतकरी ‘ओटीएस’ योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ शक्य

Farmer OTS Scheme : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शेतीकर्जाची जून-२०२३ अखेर विक्रमी २०७.५८ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. बॅँकेने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला.

Team Agrowon

Sangli News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शेतीकर्जाची जून-२०२३ अखेर विक्रमी २०७.५८ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. बॅँकेने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उर्वरित शेतीकर्जाच्या वसुलीसाठी ओटीएस योजना मार्च-२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा विषय सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

या वेळी जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्यासह बॅंकेचे संचालक उपस्थित होते.

मानसिंगराव नाईक म्हणाले, की बॅँकेच्या शेती, बिगरशेतीची थकबाकी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बँकेचा एनपीए १४ टक्क्यांवर गेला होता. गेल्या दोन वर्षांत थकबाकी कमी करण्यासाठी उपाययोजना राबवल्या.

बिगरशेतीसह शेतीकर्जाला एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली. जून-२०२२ अखेर ४६ हजार ३६७ शेतकऱ्यांकडे ४८१.४३ कोटींची थकबाकी होती. जून-२०२३ अखेर यातील २० हजार ५७४ शेतकऱ्यांकडून २०७.५८ कोटींची थकबाकी वसूल झाली. ‘ओटीएस’अंतर्गत तब्बल १६.२९ कोटीची व्याजमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे थकबाकी वसुली वाढली.

आगामी वर्षभरात उर्वरित थकबाकी वसुलीचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा बँकेचे अद्यापही २६ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. शेतकरी संघटनांकडून ‘ओटीएस’ला मुदतवाढीची मागणी आहे. यावर बैठकीत चर्चा झाली. ओटीएस योजनेला मार्च-२०२४ पर्यंत मुदतवाढीचा विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा निर्णय झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT