Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळ पीकविम्याचा लाभ घ्यावा

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२२-२३) आंबिया बहरामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, व पपई या फळपिकांना लागू करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजने (PM Crop Insurance Scheme) अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२२-२३) आंबिया बहरामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, व पपई या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या (Department Of Agriculture) वतीने करण्यात येत आहे.

तालुकानिहाय पिके आणि विमा हप्त्याची रक्कम पुढीलप्रमाणे

आंबा ः दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरूर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर व सासवड या तालुक्यांतील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १५ हजार ४०० रुपये इतकी आहे.

डाळिंब ः दौंड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापूर, सासवड, शिरूर, हवेली व खेड या तालुक्यांतील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ९ हजार ७५० रुपये इतकी आहे.

द्राक्ष ः दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर व शिरूर या तालुक्यांतील द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.

केळी ः दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, खेड, हवेली व शिरूर या तालुक्यांतील केळी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ७ हजार रुपये इतकी आहे.

मोसंबी ः इंदापूर तालुक्यातील मोसंबी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

संत्रा ः शिरूर तालुक्यातील संत्रा फळपिकासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

पपई ः आंबेगाव, जुन्नर व इंदापूर तालुक्यांतील पपई फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १ हजार ७५० रुपये इतकी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आंबिया बहरातील फळपिकांची विमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय विमा कंपनीचे १८०० ४१९ ५००४ दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT