Urea Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Urea Shortage : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांना मिळेना युरिया

सध्या गहू पिकासह बागायती पिकांना युरिया खताचा डोस शेतकरी देत आहेत. यासाठी बाजारात युरिया खत मिळत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत.

Team Agrowon

नांदेड : जिल्ह्यात रब्बीतील पिकांना (Rabi Crop) लागणाऱ्‍या युरिया खताची टंचाई (Urea Fertilizer Shortage) निर्माण झाली आहे. ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे युरिया उपलब्ध आहे, ते शेतकऱ्यांना चढ्या दराने विक्री करत आहेत. याकडे कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यात सध्या गहू पिकासह बागायती पिकांना युरिया खताचा डोस शेतकरी देत आहेत. यासाठी बाजारात युरिया खत मिळत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत. सध्या शेतकरी नांदेडसह ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडे युरियाची मागणी करीत आहेत. परंतु त्यांना युरिया नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्या विक्रेत्यांकडे युरिया आहे, ते मात्र पोत्याला ५० रुपये अधिक दराने विक्री करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या बाबत कृषी विभागाने विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तर दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर मात्र विक्रेत्यांकडे युरिया शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे.

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी त्यांच्याकडील खताची विक्री ई-पॉस मशिनवर दाखविली नाही. त्यामुळे विक्रेत्यांकडे खत शिल्लक दिसत आहे. परंतु या खताची विक्री झाल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे मत आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी आरसीएफ कंपनीचा १०८९ टन युरिया जिल्ह्यातील विक्रेत्यांना पुरविण्यात आला आहे. आगामी दोन दिवसांत अडीच हजार टन कोरोमंडल कंपनीचा युरिया मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी हुंडेकर यांनी दिली.

नॅनो युरियाचा वापर करावा

जिल्ह्यात सध्या गव्हाला युरियाचा डोस देण्याचे काम सुरू आहे. शेतकरी आजही यासाठी युरियाचा वापर करतात. शेतकऱ्यांनी युरियाऐवजी फवारणीद्वारे नॅनो युरियाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. परंतु शेतकरी मात्र युरियाच्या वापरावरच भर देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT