Vasantrao Naik Agriculture University Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural University : विद्यापीठाच्या संशोधनात शेतकऱ्यांना सहभागी करून घेणार : कुलगुरू डॉ.‌ मणी

शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या संशोधनात सहभागी करून घेणार आहोत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ‌इंद्र मणी यांनी केले.

टीम ॲग्रोवन

परभणी : अनेक शेतकरी हे संशोधक (Agricultural Researcher) आहेत. अनुभवाच्‍या आधारे अनेक शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान (Agricultural Technology) विकसित केले आहे. या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या (Agricultural University )संशोधनात सहभागी करून घेणार आहोत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (Vasantrao Naik Marathwada University) कुलगुरू डॉ. ‌इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केले.

सायाळा खटिंग (ता. परभणी) येथील शेतकरी शिवाजी खटिंग यांनी या दादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवड केलेल्या कापूस प्रक्षेत्रास गुरुवारी (ता. १५) डॉ. इंद्र मणी यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी दादा लाड, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, डॉ. केदार खटिंग, शिवाजी खटिंग आदींसह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

डॉ. इंद्र मणी म्‍हणाले, की दादा लाड यांचे कापसातील तंत्रज्ञान निश्‍चितच चांगले असून, या तंत्रज्ञानाचा विद्यापीठ संशोधनात समाविष्ट करण्‍यात येऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न राहणार आहे. दादा लाड म्‍हणाले, की कपाशीच्या पिकांतील दोन झाडे आणि दोन ओळीतील अंतर कमी करून झाडांची संख्‍या योग्‍य राखणे आवश्‍यक आहे.

झाडाच्या खालच्या गळफांद्या काढल्याने दाटी कमी होते. गळफांद्या काढल्यावर खोड शेंड्यापर्यंत जाड बनते. गळफांद्या काढल्याने बोंडाचा आकार मोठा होण्‍यास मदत होते. एकरी झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते. डॉ. देवसरकर म्‍हणाले, की दादा लाड यांचे तंत्रज्ञान पद्धतीत एकरी झाडांची संख्‍या योग्‍य राखल्‍यामुळे कापूस उत्‍पादनात वाढ होते, असेही ते म्हणाले.

डॉ. देवसरकर म्‍हणाले, की दादा लाड यांचे तंत्रज्ञान पद्धतीत एकरी झाडांची संख्‍या योग्‍य राखल्‍यामुळे कापूस उत्‍पादनात वाढ होते, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT