Alibag Corridor Agrowon
ताज्या बातम्या

Virar-Alibag Corridor : विरार-अलिबाग कॉरिडोरविरोधात पेणमधील शेतकरी आक्रमक

Virar-Alibag Corridor Project : विरार-अलिबाग कॉरिडोर प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील रावे येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जमिनीच्या अंतिम सर्व्हेसाठी रविवारी (ता. १६) आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले.

Team Agrowon

Pen Farmers : पेण : विरार-अलिबाग कॉरिडोर प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील रावे येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जमिनीच्या अंतिम सर्व्हेसाठी रविवारी (ता. १६) आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडताना, सरकार करत असलेल्या विकासाला विरोध नाही; मात्र हा प्रकल्प करताना स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.

नव्याने होत असलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा अंतिम सर्व्हे करण्यासाठी संबंधित अधिकारी पेण तालुक्यातील रावे येथे आले होते. सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या अंतिम सर्व्हेला विरोध दर्शवला. १५ वर्षांपूर्वी याच जमिनी सेझ प्रकल्पासाठी संपादित केल्या होत्या. त्यावेळी येथील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. त्यानंतर प्रशासनाने आश्वासने देत या जमिनी सेझसाठी घेतल्या; पण आजतागायत येथे प्रकल्प उभा राहिला नाही. त्यामुळे जमिनी प्रकल्पाच्या नावे झाल्या असल्या तरी आजही जमिनीवर ताबा शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे १५ वर्षे उलटून गेल्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करावीत, अशी मागणी सातत्याने केली आहे.

विरार-अलिबाग कॉरिडोर प्रकल्पाला विरोध नाही; परंतु या जमिनीवर आजही शेतकऱ्यांचा ताबा असल्याने शासकीय यंत्रणेने आम्हाला विश्वासात घेतले पाहिजे. फक्त नोटिसा पाठवून सर्व्हे केले जात आहे. हे चुकीचे आहे. आधी येथील जमिनी सेझसाठी घेतल्या; परंतु प्रकल्पच उभा राहिला नाही.

- नरेंद्र पाटील, प्रकल्पबाधित, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT