Potato Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Potato Cultivation : पाथर्डीत बटाटा शेतीकडे ओढा

पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचा ओढा आता बटाटा पिकांकडे वळला आहे. चांगले उत्पन्न व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केलेल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेण्यास प्राधान्य दिले आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचा ओढा आता बटाटा पिकांकडे (Potato Crop) वळला आहे. चांगले उत्पन्न व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केलेल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेण्यास प्राधान्य दिले आहे. उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करणाऱ्या गावांमध्ये १२० हेक्टरवर बटाटा पिकाने बाळसे धरल्याचे चित्र आहे.

पाथर्डी तालुक्यातील भालगाव, मुंगूसवाडे, कासाळवाडी या परिसरातील शेतजमीन बटाटा पिकासाठी पोषक आहे. गावातील हवामानही या पिकासाठी पोषक असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी बटाटा पीक घ्यावे, यासाठी तालुका कृषी अधिकारी सुरेश शिंदे, ज्ञानेश्‍वर दौंड व याच भागात राहत असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. जयहिंद खेडकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता

बटाटा पीक साधारणतः नव्वद दिवसांत येते. एका एकरामध्ये साधारणतः आठ ते दहा टन बटाटा उत्पादित होतो. एकरी खर्च ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत येतो. बटाटा पिकाला सध्या १० ते १२ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत असल्याने एकरी एक लाख रुपयाचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डॉ. खेडकर यांच्या शेतात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. या वेळी मीननाथ बेलेकर, प्रकाश गायके, अर्जुन सुपेकर, गोवर्धन खेडकर, अंकित खेडकर आदी शेतकरी उपस्थित होते.

शिंदे यांनी बटाटा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, कीड व रोगाची व्यवस्थापन याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी अन्नप्रक्रिया उद्योगातून बटाट्याचे वेफर्स, चिप्स बनवणे व इतर उपपदार्थांकडे वळल्यास शेतकऱ्यांना अधिकचा नफा होईल, असे सांगितले.

पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा शेतीचा शेतकरी प्रयोग करत आहेत. यंदा अनेक शेतकऱ्यांनी बटाटा शेतीचा प्रयोग केला असून, तो यशस्वी झाला आहे. या भागात बटाट्याचे क्षेत्र वाढू शकते.
सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी, पाथर्डी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT