Water Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : माळशिरसमध्ये ‘नीरे’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

राज्य सरकारने राज्यातील सर्वच धरणांवरील कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार नीरेच्या पाण्यासाठीही समिती नेमली आहे.

टीम ॲग्रोवन

लवंग, जि. सोलापूर ः राज्य सरकारने राज्यातील सर्वच धरणांवरील कालवा सल्लागार समितीची (Canal Advisory Committee) पुनर्रचना केली आहे. त्यानुसार नीरेच्या पाण्यासाठीही (Nira Water) समिती नेमली आहे. पण या नवीन समितीने रब्बी हंगामाचे (Rabi Season) पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचा अद्याप निर्णय घेतला नसल्याने माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील शेतकरी पिके पाण्याला आली असल्याने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करत आहेत.

पावसाळा संपून महिना झाला आहे. पिके पाण्याला आली आहेत. परंतु नीरा उजवा कालव्यातून अद्याप जलसंपदा विभागाचा पाणी सोडण्याचा निर्णय झाला नसल्याने शेतकरी कालव्याला पाणी कधी येणार असा प्रश्न करीत आहेत. शेतकऱ्यांना गहू, हरभरा, मका पिकांची पेरणी चालू करायची आहे. विहीर, बोअर वरील शेतकऱ्यांनी पेरण्या चालू केल्या आहेत.

परंतु निव्वळ कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरण्या करता येत नसल्याने पाणी कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील देवघर आणि भाटघर तर सातारा जिल्ह्यातील वीर धरणाचे पाणी नीरा उजवा कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना मिळते.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या कालवा सल्लागार समितीचे सहअध्यक्ष असणार आहेत. या पुनर्रचनेत शिफारस केलेले शेतकऱ्याचे सदस्यत्व कमी करून समितीमधील पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलेही बदल केले नाहीत. पण पाण्याबाबत निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे त्याकडे लागले आहे.

राज्य सरकारने कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना केली असून, आता पूर्वीचे अध्यक्ष असणारे जलसंपदा मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्याऐवजी ज्या जिल्ह्यात धरण आहे. त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे आता कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील.
एच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT