Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : केळी पीकविम्यापासून जळगावातील शेतकरी वंचित

जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील शेतकऱ्याच्या कर्ज खात्यातून पीकविमा रक्कम कपात होऊनही अद्यापपर्यंत या शेतकऱ्याला केळी पीकविम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही.

Team Agrowon

जळगाव : जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील शेतकऱ्याच्या कर्ज खात्यातून पीकविमा (Crop Insurance) रक्कम कपात होऊनही अद्यापपर्यंत या शेतकऱ्याला केळी पीकविम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही.

त्यामुळे हतबल शेतकऱ्याने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करून मदत मिळवून देण्याची मागणी करत अन्नत्यागाचा इशारा दिला आहे.

नंदगाव येथील वासुदेव अवचित सोनवणे या शेतकऱ्याने नंदगाव शिवारातील आपल्या दोन हेक्टर शेताचा केळी पिकाचा विमा बँकेमार्फत काढला होता.

विमा रकमेची कपात
पीकविमा योजनेंतर्गत केळी या पीकविम्याची रक्कम जळगाव येथील प्रतापनगरमधील आयसीआयसीआय बँकेच्या पीककर्ज खात्यातून २९ ऑक्टोबर २०२१ ला कपात करण्यात आली होती.

मात्र पीकविमा मंजूर होऊनही या शेतकऱ्याला तीन महिने उलटूनही नुकसानभरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही.

शेतकरी मागील तीन महिन्यांपासून या प्रकरणात बँक, विमा कार्यालय, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आदी कार्यालयांमध्ये विचारणा करीत असून, आजतागायत त्यांना बँकेकडून याबाबत उडवाउडवीचीच उत्तरे मिळत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


तीन महिन्यांपासून शेतीचे काम सोडून पीकविमा रक्कम मिळविण्यासाठी हेलपाटे खावे लागत असल्यामुळे वासुदेव सोनवणे हतबल झाले असून,

त्यांनी जिल्हाधिकारी तथा पीकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अमन मित्तल यांना निवेदन देत आपल्या स्तरावरून त्वरित चौकशी करून विमा नुकसानभरपाई मिळवून देण्याची विनंती केली.

न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने बेमुदत अन्न सत्याग्रह करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ICRISAT Groundnut Varieties : भुईमुगाचे दोन नवीन वाण इक्रीसॅटने केले विकसित; तेलाचं प्रमाण आणि पोषणमूल्यही जास्त, टिकवण क्षमता अधिक

Agriculture Day: शेतीचे महत्त्व अनन्यसाधारण : गौडा जी. सी.

Indigenous Cows Conservation: आम्ही ‘बी’ घडलो

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेच्या प्रक्रियेला विलंब;...तोपर्यंत थकित पीक कर्जावर व्याज आकारणी नको, बँकांना निर्देश

ZP Meeting 2026: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’ सभेत ‘कृषी’कडे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT