Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पीक कर्जासाठी शेतकऱ्याचे उपोषण

एका राष्ट्रीयीकृत बँकेने पीक कर्ज नाकारल्याने धरणगाव (ता. जळगाव) येथील शेतकरी योगेश रामलाल पुरभे यांनी धरणगाव शहरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव : एका राष्ट्रीयीकृत बँकेने (National Bank) पीक कर्ज (Crop Loan) नाकारल्याने धरणगाव (ता. जळगाव) येथील शेतकरी योगेश रामलाल पुरभे यांनी धरणगाव शहरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शरद जोशीप्रणित (Sharad Joshi) शेतकरी संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. संघटनेचे माजी उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष कडूअप्पा पाटील (Kaduappa Patil)यांनी उपोषणस्थळी जाऊन पुरभे यांची भेट घेतली.

तसेच या उपोषणात काही वेळ सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले. सोमवारपासून (ता.१९) हे उपोषण धरणगाव येथील युनियन बँकेच्या शाखेसमोर सुरू केले आहे. बँकेकडून योगेश यांनी कर्ज घेतले होते.

कोविड काळात ते थकबाकीदार झाले. यानंतर २ फेब्रुवारी २०२२ रोजी पीक कर्जाची रक्कम व्याजासह बँकेत भरली. बँकेने पीक कर्ज भरताना नव्याने पीक कर्ज देऊ, असे सांगितले होते. त्यासाठी योगेश यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्यासाठी १० ते १२ हजार रुपये लागले.

ही कागदपत्रे बँकेत प्रमुख अधिकाऱ्याकडे सादर केली. पण दोन महिने पीक कर्ज दिलेच नाही. नंतर बँकेतील कृषिसंबंधी कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्याकडे पीक कर्जाची फाइल पोचली.त्यांनीही तीन महिने पीक कर्ज दिलेच नाही. पाच महिने हा प्रकार झाला. नंतर बँकेने योगेश यांचे बंधू थकबाकीदार असल्याचे कारण सांगून त्यांना पीक कर्ज नाकारले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT