Kisan Long March Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Long March : लाँग मार्चमुळेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण : जे. पी. गावित

मुंबई येथे काढण्यात आलेल्या लाँग मार्चमुळेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. याच लाल बावट्याने शेतकऱ्याला फॉरेस्टही मिळवून दिले, असे प्रतिपादन माजी आमदार जे. पी. गावित यांनी येथे केले.

Team Agrowon

Kisan Long March हरसूल, ता. त्र्यंबकेश्‍वर : मुंबई येथे काढण्यात आलेल्या लाँग मार्चमुळेच शेतकऱ्यांच्या मागण्या (Farmers Demand) पूर्ण झाल्या. याच लाल बावट्याने शेतकऱ्याला फॉरेस्टही मिळवून दिले, असे प्रतिपादन माजी आमदार जे. पी. गावित (J. P. Gavit) यांनी येथे केले.

लाँग मार्चच्या यशानंतर हरसूल येथे नुकतीच किसान सभेतर्फे विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. श्री. गावित म्हणाले, की कॉम्रेड व संघटनेमुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले. मुंबईतील लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शेतकऱ्यांची स्तुती करून त्यांनी मनोबल वाढवले.

ते म्हणाले, की वन जमिनीच्या कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यासाठी वेळोवेळी निवेदने दिली, मोर्चे काढले, तरीसुद्धा शासन जागे होत नव्हते. म्हणून नाशिक जिल्ह्यातून थेट पायी लाँग मार्च काढत शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले.

माकपचे राज्य सचिव इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली हरसूल येथील शासकीय रुग्णालयाजवळून विजयी मिरवणूक काढण्यात आली. विविध आदिवासी वाद्यांच्या तालावर नृत्य करत हजारो शेतकरी वाजत-गाजत, डीजेच्या तालावर जल्लोष करत सभेच्या ठिकाणी पोचले.

श्री. गावित यांना सजवलेल्या वाहनातून बिरसा मुंडा चौकात उभारलेल्या स्टेजवर आणण्यात आले. या वेळी झालेल्या सभेत माकप नेते इरफान शेख व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना, मोर्चाची ताकद काय असते आणि शासनाला अंमलबजावणी करण्यास कसे भाग पाडले, या बाबत माहिती दिली.

मोर्चादरम्यान मृत्यू झालेले रामजी डगळे (रा. खैराईपाली) व पुंडलिक जाधव (रा. दिंडोरी) यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भिवा पाटील, बाळू तिदमे, तुकाराम मोंढे, पुंडलिक गुरव, रमेश बरफ, देवराम मौळे, पांडू दुमाडे, काळू वड, भाऊराम चौधरी, पुंडलिक महाले, झिना दाहवड, पंडित गावित, नारायण आसम, रामदास बरफ, लक्ष्मण राऊत, शंकर चावरे, भारत लोखंडे, देविदास गावित, शकीब सय्यद आदींसह हजारो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT