Crop Subsidy Agrowon
ताज्या बातम्या

Crop Subsidy : मंठामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

मंठामध्ये अजूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे यांनी केली आहे.

Team Agrowon

मंठा : तालुक्यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये प्रमाणे जाहीर केलेली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे यांनी केली आहे.

तालुक्यात शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाच्या पिकांबरोबरच अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. आजच्या परिस्थितीत अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीन व कपाशीच्या पिकाचे उत्पादनात खूप कमी प्रमाणात झाले आहे.

त्यातच आता सोयाबीन व कापसाचे दर कमी झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा अनुदान देताना ठरवून दिली होती. तसेच अनुदान दीपावली पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र अतिवृष्टीचे अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक वेठीस न धरता दुष्काळ अनुदान शेतकऱ्याला तात्काळ देण्यात यावे, जेणेकरून खुल्या बाजारात कापूस व सोयाबीन पिकाचे दरवाढ होईपर्यंत शेतकऱ्यास मदत होऊ शकते, असे श्री.मोरे यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामानाची निर्मिती

Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?

Crop Damage : घेवडा करपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी

SCROLL FOR NEXT