Kolhapur Rain Update agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ, शेतकरी संकटात अडकण्याची भिती

Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे. दरम्यान काल (ता.११) मंगळवारी पावसाने पूर्णच उघडीप दिली.

sandeep Shirguppe

Kolhapur Monsoon News: कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे. दरम्यान काल (ता.११) मंगळवारी पावसाने पूर्णच उघडीप दिली. कोल्हापूर शहर आणि परिसरात तर दिवसभर उन पडले होते. यामुळे काही अंशी उष्मा वाढला होता.

मागच्या चार दिवसांपासून थांबलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. तर पंचगंगा नदीवरील राजाराम, रूई तर भोगावती नदीवरील हळदी आणि कोगे बंधाऱ्यावरील पाणी पातळी कमी झाल्याने हे बंधारे खुले झाले आहेत.

दरम्यान मागच्या २४ तासांत एक मि.मी. इतक्या पावसाचीही नोंद झालेली नाही. शहर परिसरात पावसाची एखाद-दुसरी सर कोसळली. याचबरोबर तालुक्यांमध्येही पावसाची पूर्ण उघडीप दिली आहे. यामुळे आजच्या पावसाची आकडेवारी निरंक असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

पाऊस थांबल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असून दुपारी १६ फुटांपर्यंत पातळी कमी झाली. यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा खुला झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. इचलकरंजी येथील रूई बंधाऱ्यावरील पाणीही ओसरले आहे.

भोगावती नदीवरील कोगे बंधारा खुला झाल्याने त्यावरील वाहतूकही सुरू झाली. जिल्ह्यात सध्या पाच बंधारे पाण्याखाली आहेत दरम्यान दोन दिवसात पाऊस झाला नाहीतर नद्यांची पाणी पातळी आणखी खाली जाऊ शकते.

याचबरोबर जिल्ह्यातील भात क्षेत्र तालुके असलेल्या चंदगड, राधानगरी, आजरा, गारगोटी, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यातही पावसाने पाठ फिरवल्याने भात लावणीच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. दरम्यान पुढच्या काही दिवसांत पाऊस झाला नाहीतर शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT