Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसामुळे शेतकरी समाधानी

Latest Rain Update : महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतीला पूरक वेळेत पाणी मिळेल की नाही, या भीतीने शेतकरी धास्तावलेले होते. परंतु, गोकुळाष्टमीपासून जिल्ह्यात पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी राजा सुखावला आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतीला पूरक वेळेत पाणी मिळेल की नाही, या भीतीने शेतकरी धास्तावलेले होते. परंतु, गोकुळाष्टमीपासून जिल्ह्यात पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी राजा सुखावला आहे. अशातच ऑगस्ट महिना कोरडा गेला असल्याने भात वाढीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र, पुन्हा पावसाचे आगमन झाले असल्याने भातशेतीला उभारी मिळणार आहे.

महिनाभर पावसाने ओढ दिल्याने भातशेती संकटात आली होती. भाताच्या वाढीवर पाऊस नसल्याने परिणाम होणार असल्याची चिन्हे असल्याने वर्षभरापासून केलेली मेहनत वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. पावसाने ओढ दिल्याने पुन्हा नव्या संकटाला सामोरे जाण्याच्या काळजीत असलेल्या शेतकऱ्यावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवत दमदार हजेरी लावली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याभर पावसाने हजेरी लावल्याने पिके पुन्हा तरतरीत झाली आहेत. तसेच मघा नक्षत्र बुधवारी संपत असून गुरुवारी पिठोरी अमावस्येला उत्तरा नक्षत्र निघत आहे.

या नक्षत्रात पाऊस हत्ती वाहनावर असल्याने दमदार लागेल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे भातशेती पुन्हा तेजदार झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

भातलावणी केल्यानंतर उशिरा पाऊस झाला असल्याने काही पाणथळ शेती कुजून वाहून गेली. त्यातून जी वाचली ती पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा कोरडी पडली. परंतु, आता पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतीला जीवदान देईल अशी, आशा वाटू लागली आहे.
- लक्ष्मण खांडेकर, शेतकरी
शेतीला आता तरतरी आली आहे. या पाण्याला ‘गर्भाचे पाणी’ म्हणण्याची प्रचलित पद्धत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्रच बिघडले आहे. शेती टिकणे ही काळाची गरज आहे.
- जयश्री रसाळ, महिला शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT