Government Subsidy Agrowon
ताज्या बातम्या

Government Subsidy : शेतकरी सरकारी अनुदानापासून वंचितच

काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा; वाडा तालुक्यात भात उत्पादक आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत

Team Agrowon

वाडा : आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत येणाऱ्या पालघर (Palghar) जिल्ह्यातील ३३ भात खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातासाठी प्रतिक्विंटल ७०० रुपयांचे अनुदान (Subsidy),

तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मात्र आजतागायत ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

ही मदत शेतकऱ्यांना त्वरित द्यावी, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी दिला आहे.

रोगराई, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस या नैसर्गिक संकटांशी सामना करीत पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकविलेल्या भाताची खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून केली गेली.

केंद्र सरकारने भाताचा दर १९४० रुपये प्रतिक्विंटल इतका दिला. केंद्र सरकारच्या दिलेल्या या दराव्यतिरिक्त राज्य सरकारकडून ७०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल, असे शासनाकडून शेतकऱ्यांना आश्वासित करण्यात आले होते.

मात्र शासनाने या आश्वासनांची आजतागायत पूर्तता केलेली नाही.

नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राज्यात शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले.

या सरकारने महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या संदर्भातील घेतलेल्या निर्णयाला कायम ठेवले. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यात राज्यातील शिंदे सरकारने अनुदानाला मंजुरी दिली आहे.

मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. शेतकरी अनेक दिवसांपासून निधीची प्रतीक्षा करीत
आहेत.

यंदा तीन लाख ८७ हजार क्विंटल भात खरेदी पालघर जिल्ह्यातील ११ हजार ७४६ शेतकऱ्यांकडून आदिवासी विकास महामंडळाकडून तीन लाख ८७ हजार ५०१ क्विंटल भाताची खरेदी झाली आहे. या भाताची एकूण किंमत ७५ कोटी १७ लाख ५३ हजार ४३३ रुपये इतकी असून ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली आहे.

मात्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना जाहीर केलेली प्रतिक्विंटल सातशे रुपये इतके सानुग्रह अनुदानाची (बोनस) रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर आजतागायत जमा झालेली नाही.

अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन सानुग्रह अनुदान व आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे अनुदान लवकरात लवकर जमा न झाल्यास संपूर्ण जिल्ह्याभर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT