KCR Agrowon
ताज्या बातम्या

KCR in Maharashtra : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील ‘बीआरएस’च्या गोटात

Raghunathdada patil : शेतकरी संघटनेचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात दाखल झाले आहेत.

Team Agrowon

Pune News : शेतकरी संघटनेचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात दाखल झाले आहेत. तेलंगणानंतर महाराष्ट्रात ‘किसान सरकार’ स्थापनेसाठी प्रयत्नशील असलेले केसीआर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मंगळवारी (ता. १) केसीआर यांनी पाटील यांच्या साखराळे (इस्लामपूर) येथील निवासस्थानी एकत्रित भोजन केले.

शेतकरी संघटनेचे संस्थापक दिवंगत शरद जोशी यांच्यासोबत काम केलेले आणि त्यांचा वारसा पुढे चालविणारे रघुनाथदादा पाटील यांची नुकतीच हैदराबाद येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत तब्बल सात तास बैठक झाली. या बैठकीत दिवंगत शरद जोशी यांनी मांडलेला शेतीचा सिद्धांत आणि विविध शेतकरी कायद्यांवर सविस्तर चर्चा झाली.

अनेक कायदे शेतकरीविरोधी असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी केसीआर तेलंगणामध्ये विविध शेतकरी हिताच्या योजना राबवित आहेत.

याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून, शेतकरी आत्महत्या कमी होत आहेत. काही दिवसांनी त्या पूर्णपणे बंद होतील. यामुळे आपण भारत राष्ट्र समितीत दाखल झाल्याचे त्यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

दरम्यान ‘बीआरएस’चे बोधवाक्य हे ‘अबकी बार किसान सरकार’ असून, या बोधवाक्यानुसार महाराष्ट्रातदेखील शेतकऱ्यांचे सरकार आणण्यासाठी आपण शेतकरी संघटनेचे अस्तित्व कायम ठेवून काम करणार असल्याचेही रघुनाथदादा यांनी सांगितले.

आगामी सर्व निवडणुकांमध्ये आपण राज्यभर दौरा करून शेतकरीविरोधी कायदे, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करणे, गोवंश हत्या विरोधी कायदा रद्द करणे आदी विषयांवर रान पेटवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT