ताज्या बातम्या

Ghonas Worm : घोणसअळीने चावा घेतला,अन तो थेट रुग्णालयात पोहचला

विषारी असलेली घोणस अळी आढळून आल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. विषारी समजली जाणारी घोणस अळी किवा डंकअळी ( स्लज कॅटरपिलर ) जिल्ह्यात सर्वप्रथम चिमूर तालुक्यात आढळून आली.

टीम ॲग्रोवन

यावर्षी झालेल्या रेकार्डब्रेक पावसान होत्याच नव्हत झाल.हातच पिक गेल (Crop Damage) आता असलेल्या थोडाफार पिकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बाळीराजा जिवाचे रान करित आहे.आपल्या शेतात कामा करीत असताःना एका तरूणाला घोणसअळी चावली (Ghonas Worm Bite) अन त्याला थेट रूग्णालयात दाखल व्हाव लागल.विषारी असलेली घोणस अळी आढळून आल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

विषारी समजली जाणारी घोणस अळी किवा डंकअळी ( स्लज कॕटरपिलर ) (Sluge Caterpillar) जिल्ह्यात सर्वप्रथम चिमूर तालुक्यात आढळून आली.एका शेतकऱ्याला अळीने चावा घेतला.ही घटना ताजी असतांनाच गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावातील संदिप पिपरे या तरूण यूवकाला घोणस अळीने आज ( मंगळवार ) चावा घेतला.प्रकृती अस्थव्यस्थ वाटू लागल्याने संदिपने ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.

रूग्णालयात त्याचावर उपचार सूरू आहे.संदीपची प्रकृती आता बरी आहे.या प्रकाराची माहीती मिळताच तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी संदिप पिपरेची याची रूग्णालयात जावून भेट घेतली.या अळीने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

कशी असते घोणस अळी..

घोणस आळी विषारी असते.ब्लेडसारखी काटेरी असते.या अळीचा पाठीवर केस असतात.या केसातून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते.ते विषारी असते.तिचा रंग पिवळा,हीरवा असतो.घोणस अळीनं चावा घेतल्यास अंग बधिर होतं.मात्र उपचार केल्यास बरे होतात. दरम्यान या अळी सःदर्भात कृषी विभागाने शेतकऱ्यांना जागृत असावे असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT