Bull Birthday Agrowon
ताज्या बातम्या

वाढदिवस साजरा करून फेडले बैलजोडीचे ऋण

बैल घराची श्रीमंती, बैल दाराचे वैभव, बैल शक्‍तीचा सोहळा, माझ्या भक्‍तीचा उत्सव’ अशा शब्दात ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी बैलांच्या श्रमाचे, त्यांच्या महत्तेचे वर्णन केले आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ ः शेतात राबणाऱ्या लाडक्‍या सर्जा-राजाच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी त्याला पोळ्याच्या आदल्या दिवशी आवतन दिले जाते. तसेच पोळ्याला पाहुणचार देण्याची प्रथा आहे. मात्र नेर येथील एका शेतकऱ्याने चक्‍क आपल्या लाडक्‍या बैलजोडीचा जंगी वर्धापनदिन साजरा केला. रमेश कोपरे (रा. अशोकनगर, नेर) शेतकऱ्याचे नाव आहे.

‘बैल घराची श्रीमंती, बैल दाराचे वैभव, बैल शक्‍तीचा सोहळा, माझ्या भक्‍तीचा उत्सव’ अशा शब्दात ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी बैलांच्या श्रमाचे, त्यांच्या महत्तेचे वर्णन केले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे वेगळेच स्थान आहे. घरातील एका सदस्यांप्रमाणेच शेतकरी आपल्या जनावरांकडे लक्ष्य देतो. त्याच्या आहाराकडे, आरोग्याकडे लक्ष्य देतो. त्यातूनच बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्न करीत असतात.

यातूनच कोपरे कुटुंबीयांनी चक्‍क बैलजोडीचा वाढदिवस साजरा केला. घराभोवती विद्यूत रोषणाई करण्यात आली. केक कापून तो बैलांना भरविण्यात आला. त्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांनी बैलजोडीचे औक्षण केले. त्यांना नैवेद्यही भरविण्यात आला. या सोहळ्यासाठी शेजाऱ्यांनाही आमंत्रण देण्यात आले. सध्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत आहे. मात्र काही शेतकरी बैलांचे शेतीतील महत्त्व लक्षात घेता त्यांची जोपासना करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT