Turmeric Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Rate : हळदीच्या दरात घसरण

Turmeric News : मागणीत घट; क्विंटलला १५०० रुपयांनी दर कमी

Team Agrowon

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Turmeric Production : सांगली ः गेल्या दीड ते दोन महिन्यांत वायदे बाजारामुळे हळदीच्या (Turmeric Market) दरात तेजी आल्याने दरात दोन हजार रुपयांनी सुधारणा झाली होती.

या दरम्यान, देशभरातून १२ ते १३ लाख पोत्यांची विक्री झाली होती. त्यामुळे हळद उत्पादक (Turmeric Production) शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा फायदा झाला होता.

मात्र, बाजारात हळदीच्या मागणीत घट झाल्याने दरात फार काळ तेजी राहिली नाही. त्यामुळे हळदीच्या दरात प्रति क्विटंलला १५०० रुपयांची घसरण झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी सावध पावले उचलली आहेत.

यंदाच्या हंगामात जुनी आणि नवीन हळद अशी एकूण एक कोटी दहा लाख पोती (एक पोते ५० किलोचे) बाजारात विक्रीसाठी आली आहेत. त्यापैकी सुमारे पन्नास टक्के हळदीची विक्री झाली असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला आहे.

सांगली आणि निजामाबाद येथील हळद विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी सुमारे दोन लाख पोती अजूनही शेतकऱ्यांकडे विक्रीविना शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सांगली आणि निजामाबाद याठिकाणी दररोज सौद्यास ४ हजार पोत्यांची आवक होत आहे. तर इरोड येथील बाजारात वर्षभर हळद विक्री होत असून अन्य राज्यांत हळद विक्री अंतिम टप्‍प्यात आली आहे.
वास्तविक मराठवाडा, विदर्भात हळद काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हळदीला पाणी लागल्याने सुमारे ५ टक्क्यांपासून ते २५ टक्‍क्यांपर्यंत हळद लाल झाली आहे. त्याचा परिणाम हळदीच्या दरावर होऊ लागला आहे.

परिमाणी हळद विक्रीस अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यातूनही चांगल्या दर्जाच्या हळदीला प्रति क्विंटल ६७०० ते ८००० रुपये असा दर मिळत असला तरी, दर्जेदार हळदीचे प्रमाण कमी आहे.

पन्नास टक्के हळदीची विक्री
हळदीची निर्यातीला फारशी गती नाही. त्यातच हळदीच्या दरात होणारी तेजी-मंदीही भविष्यात हळदीच्या लागवडीवर अवलंबून आहे. त्यामुळे देशात किती क्षेत्रावर हळद लागवड होईल, हे जुलै महिन्याच्या मध्यानंतरच स्पष्ट होईल.

परंतु देशात पन्नास टक्के हळदीची विक्री झाली असून सध्या हळदीला ५ हजारांपासून ९ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. हळदीच्या दरात सध्यातरी तेजी-मंदी नसल्याचे चित्र आहे.

वायदे बाजारामुळे हळदीच्या दरात तेजी आली होती. परंतु ही तेजी तात्पुरती होती. त्यामुळे दर स्थिर राहिले नाहीत.

हळदीच्या दराबाबत तेजी-मंदी ही येणाऱ्या हळद लागवडीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.
- मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT