Lumpy SKin AGrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’साठी कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा

जिल्ह्यात खासगी आणि सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊसतोडणी कामगार बैलगाड्यांसोबत, गायी, म्हैशींसह येत आहेत. यामुळे येणाऱ्या जनावरांचे लसीकरण झाले की नाही, याची तपासणी कारखाना प्रशासनाने करावी.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin Disease) चा प्रादुर्भाव झालेली जनावरे वाढत आहेत. पशुपालकांनी गायवर्गीय जनावरांची काळजी घ्यावी. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी साखर कारखाने (Sugar Mill) मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊसतोडणी कामगार बैलगाड्यांसोबत, गायी, म्हैशींसह येत आहेत. यामुळे येणाऱ्या जनावरांचे लसीकरण (Cattle Vaccination) झाले की नाही,

याची तपासणी कारखाना प्रशासनाने करावी, यासाठी सर्व साखर कारखान्यांनी एक समन्वय अधिकारी नेमावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या.‘लम्पी स्कीन’बाबत आयोजित बैठकीत श्री. स्वामी बोलत होते.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, प्रादेशिक उपसंचालक (साखर) पांडुरंग साठे, पशुसंवर्धन उपायुक्त तथा जिल्हा संनियंत्रण अधिकारी डॉ. ज्योती परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे उपस्थित होते.

श्री. स्वामी म्हणाले, की जिल्ह्यात लम्पी आजाराने ५५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३८ गाय तर १७ बैलांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९३.२९ टक्के जनावरांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित जनावरांचे आठवड्याभरात लसीकरण होईल, याचे नियोजन करावे.

प्रत्येक साखर कारखान्यांनी ऊसतोडणीसाठी जिल्ह्यात येणाऱ्या जनावरांचे लसीकरण झाले की नाही, याची तपासणी करावी. ई-पीक पाहणीसाठी प्रवृत्त करासध्या शासनाकडून ई-पीकपाहणी उपक्रम सुरू आहे, जिल्ह्यात सुमारे तीन लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत.

साखर कारखाना प्रशासनाने उसाचे क्षेत्र ऑनलाइन होईल, यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. ई-पीकपाहणीचे नवीन ॲप व्हर्जन आले आहे. यामुळे स्वत:च्या शेतात, पिकात जाऊन फोटो काढून अपलोड करता येतो. यामध्ये गट कोणता हेही ॲपवर समजणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT