mahsul department  Agrowon
ताज्या बातम्या

Mahsul Din : महसूलकडून नवतंत्रज्ञान वापरून सुविधा

Revenue Department : महसूल प्रशासनातील प्रत्येक घटकाकडून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला जात आहे.

Team Agrowon

Solapur News : महसूल प्रशासनातील प्रत्येक घटकाकडून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. या विभागाने सर्वसामान्य नागरिकांना अधिक गतीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करून काम अधिक प्रभावीपणे केले असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागात विविध संवर्गात चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव नुकताच करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अधिकारी- कर्मचारी यांचा मानचिन्ह, प्रशस्तिपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी तहसीलदार सुशील बेल्हेकर, अपर तहसीलदार तुषार शिंदे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसीलदार मनोज श्रोत्री, अप्पासाहेब तोंडसे, पंडित कोळी वैभव बुचके तसेच पुरवठा नायब तहसीलदार शीतल कन्हेरे उपस्थित होते.

श्री. गुरव म्हणाले, की नवीन तंत्रज्ञानाने सर्व कामे सुलभ आणि वेळेत, पारदर्शक पद्धतीने होतात. यामध्ये ऑनलाइन सात-बारा, ई फेरफार नोंदी, ई-हक्क प्रणालीत नागरिक स्वत: फेरफारची नोंद करू शकतात. इक्विज कोर्ट प्रणालीचा वापर करून नागरिक महसूल प्रशासनाकडे सुरू असलेले दावे याबाबत माहिती घेऊ शकतात, ही कामे करीत असताना संवेदनशीलता ठेवणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत मिळवून देणे. तसेच १३२ प्रकारच्या शासकीय अंमलबजावणी करण्याबरोबरच शासकीय महसूल गोळा करण्याचे काम महसूल विभाग पार पाडत असल्याचे ते म्हणाले.

श्री. बेल्हेकर म्हणाले, की महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसुली यंत्रणेमार्फत केले जाते. महसूल विभागातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करावी. आपल्याकडे आलेला प्रत्येक नागरिकाच्या कामाचा निपटारा तत्काळ करावा. तसेच त्यांना आवश्यक असलेले सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, अव्वल कारकून महेश जाधव, मंडळ अधिकारी रवी शिंदे, महसूल सहायक सुरेश कदम, तलाठी नीलेश कुंभार, शिपाई भाऊ शिंदे, तसेच कोतवाल नागनाथ चव्हाण त्याचबरोबर पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक सारिका जाधव यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT