Onion Export Agrowon
ताज्या बातम्या

Onion Export Duty : कांद्यावरील निर्यातकर रद्द करावा ः जावंधिया

Onion Market : केंद्र सरकारने किमतीत वाढ होणाऱ्या शेतीमालाबाबत शेतकरीविरोधी धोरण राबविले आहे. कांदा निर्यातीवर ४० टक्‍के कर लावून कांदा निर्यातही बंद केली.

Team Agrowon

Nagpur News : ‘‘केंद्र सरकारने किमतीत वाढ होणाऱ्या शेतीमालाबाबत शेतकरीविरोधी धोरण राबविले आहे. कांदा निर्यातीवर ४० टक्‍के कर लावून कांदा निर्यातही बंद केली. ती तातडीने रद्द करून बाजारात स्पर्धेच्या माध्यमातून राज्य शासनाने कांदा खरेदी करावी,’’ अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राव्दारे ही मागणी करण्यात आली आहे. पत्रानुसार, यापूर्वी केंद्र सरकारने गव्हाची व तांदळाची निर्यात बंद केली.

टोमॅटो नेपाळमधून आयात केला आणि आता कांद्याच्या दरात तेजी येऊन शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळणार, तोच कांद्यावर ४० टक्‍के निर्यात कर लावला. कांदा निर्यात बंद करून शासनाने शेतकऱ्यांवर अन्यायाचे धोरण अवलंबिले आहे.

श्री. गोयल यांची २४१० रुपये प्रतिक्विंटलने दोन लाख टन कांदा खरेदीची केलेली घोषणा देखील दिशाभूल करणारी आहे, असे जावंधिया यांनी म्हटले आहे.

‘हे नाटक आताच का ? ’

शेतकऱ्यांनी स्वतःच्या जोखमीवर कांदा चाळीत ठेवला आहे. त्यातील काही कांदा सडला. आता उत्पादकाला दोन पैसे मिळायला लागल्याने राजा उदार झाला, या थाटात २४१० रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

हे नाटक आताच का ? असाही प्रश्‍न आहे. जेव्हा शेतकरी पाच ते दहा रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकत होता. तेव्हा सरकारने २४.१० रुपये प्रतिकिलोने कांदा खरेदी का केली नाही? आता शासनाने पुढील हंगामात २४ रुपये दराने कांदा खरेदी करण्याची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी जावंधिया यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT