Elephant Rampage Agrowon
ताज्या बातम्या

Elephant Rampage : हत्ती उपद्रवप्रश्नी कर्नाटकातील तज्ज्ञांची मदत घेणार

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला भेडसावणाऱ्या हत्तींच्या उपद्रवाच्या प्रश्नावर आता पुन्हा कर्नाटकमधील हत्ती तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा त्या तज्ज्ञांशी झाली असल्याची माहिती नागपूर येथील प्रधान मुख्य वनसरंक्षक वायएलपी राव यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला भेडसावणाऱ्या हत्तींच्या उपद्रवाच्या (Elephant Rampage) प्रश्नावर आता पुन्हा कर्नाटकमधील हत्ती तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा त्या तज्ज्ञांशी झाली असल्याची माहिती नागपूर येथील प्रधान मुख्य वनसरंक्षक वायएलपी राव यांनी दिली.

श्री. राव वन विभागाच्या आढावा बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक माणिकचंद रामानुजम, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले, की हत्तींकडून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. कर्नाटकमधील तंज्ज्ञाशी प्राथमिक चर्चा केली आहे; मात्र लवकरच राज्य सरकाच्या माध्यमातून कर्नाटकमधील तज्ज्ञांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांचे एक पथकही तेथे पाठविण्यात येणार असून हे पथक हत्तींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत तेथील तज्ज्ञांशी चर्चा करेल. हत्तींसह वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई अत्यल्प आहे. ही भरपाई वाढवून मिळाली यासाठी राज्याकडे प्रस्ताव पाठविला असून या प्रस्तावाच्या आधारे नुकसानीच्या मदतीत मोठी वाढ मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT