Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Bills : शिरूर महावितरण विभागाकडून रीडिंग न घेता जादा बिले

ग्राहकांची लूट थांबवा; मनसेचा आंदोलनाचा इशारा

टीम ॲग्रोवन

टाकळी हाजी, जि. पुणे : शिरूर शहरासह तालुक्यात घरगुती वापर असणाऱ्या ग्राहकांना रीडिंग (Electricity Reading) न घेता एका महिन्याकाठी एका ग्राहकाला तब्बल एक लाख रुपये बिल (Electricity Bill) आकारले असल्याचे जांबुत येथील विद्युत ग्राहक विकास गाजरे यांनी सांगितले आहे.

महावितरण विभाग ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट करत असून, मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी शिरूर तालुक्यातील जनतेकडून होत आहे. चांडोह, वडनेर, जांबुत सविंदणे, कवठे येमाई, टाकळी हाजी, मलठण, आमदाबाद व शिरूर शहरात रीडिंग न घेतल्यामुळे चुकीचे रीडिंग येत आहे.

प्रत्यक्ष रीडिंग वेगळे आणि बिलांवर वेगळे या कारणामुळे ग्राहकाला विनाकारण बिल जास्त भरावं लागत आहे. मीटरचे रीडिंग फोटो हा मोबाईल मध्ये काढत असल्यामुळे मीटरचा फोटो त्यामध्ये अचूक येत नसल्यामुळे रीडिंग चुकीचे टाकत आहे. या चुकीच्या पद्धतीने रीडिंगची तफावत होत असल्यामुळे विनाकारण जादा बिल भरण्याचा त्रास ग्राहकांना होत आहे.

ग्राहकांची होणारी लूट तत्काळ थांबवावी व संबंधित एजन्सीवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा, मनसे स्टाइलने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल.
अविनाश घोगरे, मनसे शहराध्यक्ष, शिरूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT