APMC, Nashik  Agrowon
ताज्या बातम्या

APMC, Nashik : नाशिक बाजार समितीमधील भ्रष्टाचाराबाबत ‘ईडी’कडे पुरावे सादर

तक्रारदारांची माहिती; माजी सभापती म्हणतात आरोप निरर्थक

Team Agrowon

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजप नेते दिनकर पाटील व सुनील केदार यांनी ईडी (अंमलबजावणी संचालनालया)कडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ‘ईडी’कडून पुरावे सादर करण्याबाबत एक महिन्यापूर्वी त्यांना पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचारसंबंधी ४४ विषयांच्या अनुषंगाने पुरावे ‘ईडी’चे सहायक संचालक वेंकट नरेन गारपाठी यांच्याकडे सादर केल्याची माहिती तक्रारदार सुनील केदार यांनी दिली.

‘ईडी’कडे पुरावे सादर करतेवेळी भाजप नेते दिनकर पाटील, सुनील केदार व बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे हे उपस्थित होते. करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत २००९ ते २०२१ या या कालावधीतील लेखा परीक्षण अहवालातील महत्त्वाची कागद पत्रे सादर करण्यात आली आहेत. तत्कालीन सभापती देविदास पिंगळे व त्यांच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात बाजार समितीची शेकडो एकर जमीन बेभाव विक्री करण्यात आलेली आहे. या संदर्भात ईडीकडे चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन ईडीकडून महिनाभरापूर्वी पुरावे सादर करण्याचे पत्र मिळाले. त्यानुसार संबंधित माहिती ईडीला सादर केली आहे.बाजार समिती कर्मचाऱ्यांची रक्कम बळजबरी काढून घेतल्याप्रकरणी सभापती पिंगळे यांच्या विरोधात ‘एसीबी’ने केलेल्या कारवाईची कागदपत्रे, पुरावे आदी कागदपत्रे सादर केले आहेत.

शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील, सुनील केदार राजकीय आकसापोटी बिनबुडाचे आरोप करीत असून, ‘ईडी’ची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी केलेले आरोप निरर्थक असून, ज्या प्रकरणात उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, त्याच प्रकरणी पुन्हा आरोप करून ते अक्षरशः न्यायालयाचा अवमान करीत आहेत. आरोप निरर्थक आहेत, त्यामुळे या प्रकरणी तिघांविरोधात अवमान याचिका आणि अब्रूनुकसानीचा दावा करणार.

- देविदास पिंगळे, माजी सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT