APMC Pune  Agrowon
ताज्या बातम्या

APMC Latest News : बाजार समितीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी हालचालींना वेग, सरकारकडून समितीची स्थापना

APMC Employee Pension : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठित केली आहे.

Team Agrowon

Pension Scheme Update: अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून पेन्शन योजनेची मागणी होत होती. काही आठवड्यांपूर्वी सहकारमंत्र्यांनी यासाठी समिती स्थापन करण्यावर भाष्य केले होते. यासाठी आता राज्य सरकारच्यावतीने एक समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती दि. २५ मे १९६७ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. विविध लोकप्रतिनिधी आणि कृषी बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, परभणी यांच्यावतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी न्यायालय याचिकाही दाखल करण्यात आली होती.

या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी निवृत्तीवेतन अभ्यास समिती नियुक्त केली आहे. राज्याच्या पणन विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये कृषी पणन मंडळ, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवृत्त कर्मचारी विनोद देशमुख (शिरडकर), कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीचा एक प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.

ही अभ्यास समिती जुन्याच्या पणन कायद्यातील तरतूदी , विद्यमान पणन कायद्यातील सर्व तरतुदी , विविध न्यायालयाने दिलेले न्याय निर्णय , आर्थिक उपाय योजना , सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तीवेतन योजना , कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा निवृत्त कर्मचारी संघटना यांच्या मागण्या इ . या बाबींचा सर्वंकष विचार करून अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर हा अहवाल शासनास ३ महिन्यात सादर करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT