Agriculture Festival Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : पर्यावरणाची हानी सेंद्रिय शेतीतून टाळावी

भविष्यात येणारा काळ हा शेती क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आगामी काळात पर्यावरण पूरक शेती करणे हे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.

Team Agrowon

Kolhapur News ः भविष्यात येणारा काळ हा शेती (Agriculture Sector) क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आगामी काळात पर्यावरण पूरक शेती (Environmental Friendly Agriculture) करणे हे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.

व्यावसायिक शेती करताना सेंद्रिय शेतीला (Organic Farming) महत्त्व द्यावे. जेवढ्या जास्त प्रमाणात सेंद्रिय शेती होईल, तेवढ्या अधिक प्रमाणात कसदार अन्न सर्वांना मिळेल, असा सूर कणेरी (ता. करवीर) येथे आयोजित चर्चासत्रात उमटला.

येथील सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये शनिवारी (ता.२५) ‘शेती’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात देशभरातील विविध शेती संस्थांच्या पदाधिकारी, शास्त्रज्ञांनी भाग घेतला.

मठाधिपती काडसिद्धेश्वर म्हणाले, ‘‘भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीच जगाला तारेल. येणाऱ्या काळात मातीची सुपीकता कायम ठेवणे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय पदार्थ हाच मुख्य घटक असेल. यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीच्या पोषणाकडे अधिक लक्ष द्यावे.’’

विनय सहस्रबुद्धे, भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी, भारतीय संशोधन परिषदेचे डॉ. ए. के. सिंह, जगन्नाथ दीक्षित, कौशिक बॅनर्जी यांची भाषणे झाली. शेती करताना ती पर्यावरण पूरकच व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच प्रयत्न करावेत.

शिक्षण संस्थांतून पंचमहाभूत सजगता अभ्यासक्रम सुरू करावेत, यावर चर्चा झाली. कल्चर आणि ॲग्रिकल्चर एकत्र आल्यास निश्चितपणे सुंदर शेती पिकू शकेल, असा आशावाद या वेळी तज्ञांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT