agri Student Protest Agrowon
ताज्या बातम्या

Agri Student Protest : महात्मा फुले कृषी विद्यापीठात अभियांत्रिकीचे आंदोलक विद्यार्थी आक्रमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.

Team Agrowon

नगर ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.

मृदा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन (Agri Student Protest) गुरुवारीही (ता. २) सुरू होते.

गुरुवारी अंदोलनाचा नववा दिवस असूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी कामकाज बंद पाडले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे.

यासह इतर मागण्यांसाठी शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे हजारो विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत आंदोलन सुरूच आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या चारही कृषी विद्यापीठांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे हजारो विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. अंदोलनाला राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर चारशे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने गुरुवारी नवव्या दिवशीही आंदोलन सुरू होते.

सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थी अक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील कामकाज बंद पाडले. आतापर्यंत नऊ दिवसात सुमारे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी आजारी पडले असून त्यांना रुग्णालयात हलवले आहे. आजारी विद्यार्थ्यांत मुलींची संख्या अधिक आहे.

परीक्षा पुढे ढकलल्‍या

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी अंदोलन करत आहेत. बुधवारपासून (ता. १) होणारी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची परीक्षा प्रशासनाने पुढे ढकलली आहे. ही परीक्षा १३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अंदोलनाचा परीक्षांवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT