Sanjay Raut Agrowon
ताज्या बातम्या

ED: संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई

पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची (Sanjay Raut) त्यांच्या भांडूपमधल्या 'मैत्री' या घरी चौकशी सुरू आहे. सध्या संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा आणि बंधू सुनील यांची चौकशी सुरू आहे.

Team Agrowon

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सकाळीच ईडीचे (ED) पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडूपमधल्या 'मैत्री' या घरी चौकशी सुरू आहे. सध्या संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा आणि बंधू सुनील यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान,त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराबाहेरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच ईडी कार्यालयाबाहेरचा बंदोबस्तही वाढवला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अटकेची तयारी ईडीकडून करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान संजय राऊत यांचे वकील त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरासह इतर दोन ठिकाणी ईडीची शोधमोहीम सुरू आहे. ईडीच्या (ED) एकूण तीन पथकांसह जवळपास २५ अधिकारी तपास करत आहेत. दरम्यान सकाळी संजय राऊत यांनी याबाबतचे ट्विट केले.

कितीही कारवाया केल्या तरी शिवसेना सोडणार नाही.महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहील. जय महाराष्ट्र, असं ट्वीट ईडीची चौकशी सुरू असतानाच संजय राऊत यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT