Silk Farming Agrowon
ताज्या बातम्या

Tussar Silk Farming : वनक्षेत्रात टसर रेशीम शेतीला प्रोत्साहन द्या

Silk Farming : वन विभागाच्या मदतीने वनक्षेत्रामध्ये टसर रेशीम उद्योगाला चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकरी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

Team Agrowon

Bhandara News : जिल्ह्यात ऐन व अर्जुन वृक्षाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमणात उपलब्ध असून त्याचा वापर टसर कीटक संगोपनासाठी व्हावा. त्याअनुषंगाने संबंधित विभागांनी आपसात समन्वय साधून नियोजन करावे. वन विभागाच्या मदतीने वनक्षेत्रामध्ये टसर रेशीम उद्योगाला चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकरी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतऱ्यांच्या सभा व भेटी घेऊन तूती लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

भंडारा तालुक्यातील खापा, बासोरा व गराडा खुर्द येथील वन विभाग, रेशीम विभाग व केंद्रीय रेशीम मंडळ यांनी संयुक्तरित्या सर्व्हेक्षण करून निवडलेले वनक्षेत्र टसर लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच लाभार्थ्यांना प्रशिक्षण देऊन गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील निष्टी या गावात टसर रेशीम उद्योग पारंपरिक पद्धतीने होत असल्याने तेथे वन‍ विभागामार्फत ऐन व अर्जुन वृक्षांची लागवड करून गॅप फिलिंग करण्यात यावी. तसेच बफर झोन वनक्षेत्रात नैसर्गिकरित्या कीटक संगोपन करण्यासाठी वन विभागाने निवडलेल्या वनक्षेत्रास रेशीम विभाग, वन विभाग व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे भेट देऊन त्वरित सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना या वेळी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Survey: दुष्काळी पंचनामे आजपासून; मुख्यमंत्री फडणवीस

Karnataka Drought Crisis: दुष्काळप्रश्‍नी कर्नाटकचे विशेष अधिवेशन

Jaljeevan Mission 2.0: ‘जलजीवन मिशन २.०’साठी मनुष्यबळ द्या : केंद्राचे निर्देश

Heavy Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात वाढणार पावसाचा जोर

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

SCROLL FOR NEXT