Tribal Employment
Tribal Employment Agrowon
ताज्या बातम्या

Tribal Employment : जंगली झाडांची फुले, बियांपासून आदिवासींना रोजगार

Team Agrowon

संदीप साळवे

जव्हार : जव्हार तालुका हा दुर्गम असला, तरी या भागातील जंगलात अनेक औषधी वनस्पती, वनसंपत्ती मुबलक प्रमाणात आहे. ही वनसंपत्ती गोळा करून या भागातील गोरगरिबांना आर्थिक आधार मिळत आहे. जंगलात सापडणारी जंगली झाडांची फुले, बियांच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार (Tribal Employment) मिळत आहे.

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलसंपत्ती आहे. या जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू आणि वाडा हे तालुके आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात.

या तालुक्यातील जंगल भागात आदिवासी कुटुंबे ही जंगलातून विविध झाडांपासून मिळणारी फळे, फुले आणि बियाणे विकून आपला संसारगाडा चालवित असतात. जंगलातील काही झाडांपासून मिळणाऱ्या फळे, फुले व बिया या येथील आदिवासींना वरदान ठरत असून या जंगली रानमेव्याची विक्री करून रोजगार मिळाला आहे.

या वस्तूंची विक्री

जंगलातील साग, निलगिरी, अकेशिया, काजू, गुंज, मोह, चिंच, करंज, सीताफळ, डिंक, सागरगोटे, रिठा, बावा आदी जंगली झाडांच्या बिया तसेच सुकविलेली मोहफुले व तेलबिया यांची विक्री करून रोजगार मिळवित आहेत. विशेषतः शहरात व्यापाऱ्यांकडून वस्तुविनिमय पद्धतीने या रानमेव्याची खरेदी होत असल्याने या माध्यमातून आदिवासींना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत आहेत.

शहरातून मागणी

जंगली झाडे व अन्य वनौषधी वनस्पती यांच्या बियांना शहरी भागात खूप मागणी आहे. तसेच विविध जंगली झाडांच्या बियाण्यांची रोपवाटिकेचा व्यवसाय करणाऱ्यांकडून विशेष खरेदी केली जाते. विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात ही जंगली झाडांची बियाणे, फुले खरेदी करण्यासाठी शहरातून खास व्यापारी येत असतात.

जंगली वनस्पतींची काही फुले, बिया या नाशवंत असल्याने त्यांची योग्य साठवण केली, तरच फायदेशीर ठरते. शिवाय येथील आदिवासींनी जंगलातून गोळा केलेल्या विविध वनस्पतींच्या बिया, फुले यांची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून झाल्यास आदिवासींना अधिक दर मिळेल व त्यापासून एक शाश्वत रोजगार उपलब्ध होईल.

- गुलाब राडे, वन अभ्यासक, जव्हार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT