MPKV Agrowon
ताज्या बातम्या

Employment : अनुकंपा तत्त्वावरील १८ कर्मचाऱ्यांना नोकरी

महात्मा फुले कृषी विद्यापीठात १८ जणांना दिवाळीची भेट मिळाली आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या पुढाकाराने मयत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांचे आदेश नुकतेच दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठात (MPKV) १८ जणांना दिवाळीची भेट (Diwali Gift) मिळाली आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या पुढाकाराने मयत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांचे आदेश (Employment) नुकतेच दिले आहेत. १८ जणांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत समावून घेण्याची मागणी होती. त्यानुसार कुलगुरू डॉ. पाटील यांच्या पुढाकारातून विद्यापीठ प्रशासनाने मयत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांचे आदेश दिले.

नोकरीत सामावून घेतलेल्यांमध्ये लिपिक, प्रयोगशाळा परिचर, मजूर व शिपाई या प्रवर्गांचा समावेश आहे. शासकीय नियमानुसार एखादा कर्मचारी कर्तव्यावर असताना मयत झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा नियम आहे. त्यानुसारच संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसास नियुक्ती दिल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी दिली.

ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये या नियुक्तीचे आदेश दिल्यामुळे कुटुंबांमध्ये दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे मत नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Cycle Process: जलशास्त्र : पाण्याच्या प्रवासाचे विज्ञान

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT