Sugarcane Transportation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Transportation : ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ‘बळीराजा’चा एल्गार

जिल्ह्यामध्ये साखर कारखाने सुरू झाले असून, या कारखान्यांसाठी ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीतून बेकायदेशीर उसाची वाहतूक केली जात आहे.

Radhika Mhetre

ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ‘बळीराजा’चा एल्गार

कऱ्हाड, जि. सातारा ः जिल्ह्यामध्ये साखर कारखाने सुरू झाले असून, या कारखान्यांसाठी ट्रक, ट्रॅक्टर (Tractor), बैलगाडीतून (Bailgadi) बेकायदेशीर उसाची वाहतूक (Sugarcane Transportation) केली जात आहे. परवान्यापेक्षा ज्यादा क्षमतेने उसाची वाहतूक केली जात आहे. प्रशासन व आरटीओने एक नोव्हेंबर २०२२ पर्यंत अवैध वाहतुकीवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना अवैध वाहतुकीविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

श्री. पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव यांच्या वतीने देण्यात मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, की उसाच्या ओव्हलोड वाहतुकीकडे प्रशासन व आरटीओ विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. वाहनांच्या वाहतूक परवान्यापेक्षा ज्यादा क्षमतेने उसाची वाहतूक केली जात आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे वाहन शेतातून बाहेर काढण्यासाठी दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी लावावा लागत आहे. याचा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तसेच, शेतरस्ते खराब होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT