Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Theft : श्रीरामपूर ‘एमआयडीसी’त २९ लाखांची वीजचोरी उघड

श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीमध्ये बाबाजी श्रीधाम इंडस्ट्रीज या टाकाऊ कापडापासून सुत तयार करणाऱ्या या कारखान्याच्या ठिकाणी रामेश्वरप्रसाद मंगुराम भुराडीया या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली आहे.

Team Agrowon

नगर ः श्रीरामपूर (जि. नगर) येथील औद्योगिक वसाहतीतील (Shrirampur MIDC) बाबाजी श्रीधाम इंडस्ट्रीज आणि श्रीरामपूर इंडस्ट्रीयल इस्टेट या दोन्ही कारखान्यांच्या वीजजोडणीची (Electricity Connection) महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने २९ लाख ३९ हजार रुपयांची वीज चोरी (Electricity Theft) उघड केली आहे. दोन्ही कारखाना चालकांवर भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीमध्ये बाबाजी श्रीधाम इंडस्ट्रीज या टाकाऊ कापडापासून सुत तयार करणाऱ्या या कारखान्याच्या ठिकाणी रामेश्वरप्रसाद मंगुराम भुराडीया या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली आहे;

मात्र महावितरणच्या भरारी पथकाला वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून रिमोटच्या सहाय्याने विजेची चोरी केल्याचे भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले असून एकूण १ लाख ११ हजार २६५ विद्युत युनिटची म्हणजे एकूण १७ लाख ५३ हजार ७६० रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मालेगाव येथून आलेल्या पप्पू नामक व्यक्तीने सदर वीज मीटरच्या जोडणीत छेडछाड व रिमोट कंट्रोलची व्यवस्था करून दिल्याचे उघड झाले.

दुसऱ्या प्रकारात श्रीरामपूर इंडस्ट्रीयल इस्टेट या बर्फाच्या कारखान्याच्या ठिकाणी सचिन ज्ञानदेव गवारे या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे भरारी पथक गेले असता वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या बर्फाच्या कारखान्याच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT