APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : बारा बाजार समित्यांची २९ जानेवारीस निवडणूक

जळगाव : जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा २८ नोव्हेंबरपासून रणधुमाळी सुरू होईल. आता १२ बाजार समित्यांची मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

जळगाव : जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा (Gram Panchayat Election) २८ नोव्हेंबरपासून रणधुमाळी सुरू होईल. आता १२ बाजार समित्यांची मतदार याद्या (APMC Voter List) जाहीर करण्यात आल्या आहेत. २९ जानेवारी २०२३ ला बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC Election) घेण्याचा कार्यक्रम राज्य सहकारी प्राधिकरणाने जाहीर केला आहे.

ग्रामपंचायत, बाजार समित्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांची मतदार याद्या वेगवेगळ्या आहेत. यात विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, हमाल मापाडी, व्यापारी मतदारसंघ, अशा चार संवर्गातून प्रत्येक बाजार समितीत १८ सदस्य निवडून द्यावे लागतील. त्यासाठी बाजार समितीच्या संचालकपदासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. बाजार समित्यांची अंतिम मतदारयादी ७ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत मतदार याद्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

गेल्या वर्षभरापासून बाजार समितीच्या संचालकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर वेळोवेळी मुदतवाढ मिळाली होती. आता बाजार समित्यांच्या मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्याने इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेला कार्यक्रम असा

निवडणुकीची सूचना जाहीर करणे २३ डिसेंबर

अर्ज भरणे सुरू २३ ते २९ डिसेंबर

छाननी ३० डिसेंबर

माघारी २ ते १६ जानेवारी २०२३

अंतिम उमेदवार जाहीर १७ जानेवारी २०२३

मतदान २९ जानेवारी २०२३

निकाल ३० जानेवारी २०२३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT