APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Sindkhedaraja APMC Election : सिंदखेडराजा बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलली

Sindkhedaraja APMC : सिंदखेडराजा येथील बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश बजावले आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindkhedaraja News : बुलडाणा ः जिल्ह्यात या महिन्यात १२ ऑगस्टला संग्रामपूर व सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक घेतली जाणार होती. यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र अतिवृष्टीच्या कारणाने आधी संग्रामपूरची निवडणूक व नंतर आता सिंदखेडराजा येथील बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश बजावले आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील दोन मंडलांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती विचारात घेऊन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असे निर्देश सोमवारी (ता. ७) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले.

प्राधिकरणाकडून प्राप्त पत्रात नमूद करण्यात आले आहे, की सिंदखेडराजा तालुक्यात ५ व ६ जुलै रोजी दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत ४ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे प्राधिकरणाकडे विनंती करण्यात आली होती.

या आधारे महाराष्ट्र कृषी उत्पादन पणन (विकास व विनियमन) अधिनियमानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे अधिकार शासनास प्राप्त असल्याने प्राधिकरणाने सिंदखेडराजा बाजार समितीची निवडणूक प्रक्रियेबाबत वस्तुस्थितिदर्शक अहवाल शासनास सादर केला होता.

नैसर्गिक आपत्ती व पावसामुळे विस्कळीत होणारे जनजीवन व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणाऱ्या कालावधीचा विचार करता सहकारी संस्थेच्या निवडणुका ३० सप्टेंबर पुढे ढकलण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT