Seed Bank Agrowon
ताज्या बातम्या

Indigenous Seed Bank : गावगावांत देशी बियाणे बॅंक सुरू करण्यासाठी प्रयत्न

आदर्श गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी नुकतीच कोंभाळणें येथील बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेला नुकतीच भेट दिली.

Team Agrowon

Nagar News : आदर्श गावचे माजी सरपंच पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी नुकतीच कोंभाळणें येथील बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे (Rahibai Popere) यांच्या गावरान बियाणे बँकेला (Indigenous Seed Bank) नुकतीच भेट दिली.

त्यांच्यासमवेत पत्नी शोभा पवार व आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच विमलताई ठाणगे, ज्येष्ठ नागरिक रोहिदास पादीर व गावातील सुमारे २५ महिला उपस्थित होत्या. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हेही याप्रसंगी उपस्थित होते.

राहीबाई पोपेरे यांना उभारून दिलेल्या पाण्याच्या टाकीचे व ठिबक सिंचन उपक्रमाचे पोपटराव पवार यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यानिमित्त पवार व पठारे यांनी बीज बँकेला भेट देऊन संपूर्ण उपक्रम समजून घेतला.

याप्रसंगी विषयतज्ज्ञ संजय पाटील, जितीन साठे आदींनी बायफ संस्थेमार्फत सुरू असलेल्या गावरान बियाणे संवर्धन व वृद्धी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. बीज बँक आणि स्थानिक वानांचे संवर्धन यावर आधारित काम पाहून पवार यांनी याच पद्धतीने गावोगावी काम उभे करण्यासाठी प्रथम माझ्या गावातून मी सुरुवात करील, असे सांगितले.

गावोगावी गावरान बियांच्या बँका स्थापन व्हाव्यात, यासाठी राहीबाई यांनी घेतलेला पुढाकार शेतकऱ्यांच्या फायद्याचा असून, देशातील शेतकऱ्यांनी या विषयाची व्याप्ती समजून घेत कार्य करण्याचे आवाहन पठारे यांनी केले. राहीबाई यांनी बीज बँकेचे सुरू असलेले काम प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT