राधाकृष्ण विखे  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा प्रयत्न : विखे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत देण्याचे प्रयत्न आहेत,’’ असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Team Agrowon

नगर ः : ‘‘पंधरा दिवस सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Damage ) झाले. शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला. यामध्ये सोयाबीन पिकाचे (Soybean Crop) पूर्ण नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत देण्याचे प्रयत्न आहेत,’’ असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यातील खर्डा (सीतारामगड) (ता. जामखेड) येथे सोमवारी (ता. २४) पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. आमदार राम शिंदे या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात नागोबाची वाडी, मुंगेवाडी या ठिकाणी मोबाईलची रेंज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाणी नोंदणीसाठी मोबाईल ॲप वरून नोंदणीसाठी अडचणी निर्माण होतात. शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी. या भागातील शेतकऱ्यांना वीज जास्त दाबाने मिळावी, ६५ मिलिमीटर पाऊस असेल तरच मदत देण्यात येते. परंतु सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्याला मदत द्यावी, असा सरकारचा नियम असल्याचे सांगत सरसकट मदत देण्याची मागणी होती.

विखे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा खासगी विमा कंपन्यांवर रोष आहे. शेतकऱ्यांकडून पीकविम्यासाठी काही रक्कम भारत सरकार व राज्य सरकार भागीदारी करून भरत असते. त्या पटीत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. ६५ मिलिमीटर पावसाची अट असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा फायदा मिळत नाही. त्या विषयावर त्या नियमात काय त्रुटी राहिल्या आहेत, त्या शिथिल करण्याचा प्रयत्न आहे. ७२ तासांच्या आत विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळविणे बंधनकारक ही आठ शिथिल करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. कृषिमंत्र्यांशी चर्चा करून ही अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करू.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT