Avocado Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Avocado Cultivation : अॅवोकॅडो वाढविण्यासाठी प्रयत्न

Horticulture Scheme : अॅवोकॅडो नावाच्या विदेशी फळाची लागवड राज्यात वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

Team Agrowon

Pune News : अॅवोकॅडो नावाच्या विदेशी फळाची लागवड राज्यात वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व आत्मा यंत्रणेने त्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू केले आहेत.

भारतीय फळबाजारात अॅवोकॅडो मूळ धरतो आहे. २०२१ मध्ये १३ कोटी रुपयांचे विदेशी अॅवोकॅडो विकले गेले होते.

ही विक्री सतत वाढते आहे. देशात गेल्या वर्षी म्हणजे २६ कोटींचे तर चालू वर्षात ५० कोटींचे अॅवोकॅडो विकले गेले. भरपूर प्रथिने, व्हिटॅमिन्स असलेल्या या फळांचे व्यापारी उत्पादन घेण्यास राज्यातील भौगोलिक स्थिती अनुकूल आहे.

राज्यात अॅवोकॅडोच्या बागा वाढविण्यास संधी असल्याचे येताच हेक्टरी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त लागवड अनुदान देण्याचे यापूर्वीच जाहीर केले गेले आहे. शेतकऱ्यांना अॅवोकॅडो उभारणीसाठी अनुदान अर्ज दाखल करता येण्याकरिता राज्याच्या कृषी विभागाने महाडीबीटीच्या ऑनलाइन संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मूळ अमेरिकेचे फळ असलेल्या अॅवोकॅडोला जागतिक बाजारात चांगली मागणी आहे. या फळात उत्तम पोषणमूल्य असलेले भरपूर घटक आहेत. फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी राज्यात अॅवोकॅडोच्या बागा वाढविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच सोमवारी (ता. ३१) पुणे येथील यशदामध्ये कार्यशाळेचे आयोजन केले आहे. राज्यात सध्या अंदाजे ५० हेक्टरवर अॅवोकॅडोच्या बागा उभारल्या गेल्या आहेत. नाशिक, पुणे, कोकणासह मराठवाड्यात बीडसारख्या भागातील शेतकरीदेखील अॅवोकॅडो लागवडीत पुढे येताना दिसत आहेत.

६० लाखांचे अॅवोकॅडो केले निर्यात

भारतीय बाजारात अॅवोकॅडोची आयात आता ५० कोटी रुपयांच्या पुढे पोहोचली आहे. फलोत्पादन मंडळाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले, की टांझानिया, हॉलंड, न्यूझीलंड, पेरू, युगांडा येथून अॅवोकॅडोची आयात होते आहे.

विशेष म्हणजे अॅवोकॅडोत आता आपण केवळ आयातदार देशांच्या यादीत राहिलेलो नाही. या फळाचे उत्पादन करण्याचा मान भारतीय शेतकऱ्यांनी मिळवला आहे. गेल्या वर्षी चक्क ६० लाख रुपये किमतीचे अॅवोकॅडो निर्यात करण्यात यश मिळाले आहे. ही निर्यात यापुढे वाढत जाण्याची चिन्हे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा बाजारात चढ-उतार, हळदीच्या दरात किंचित वाढ, वांग्याच्या भावात बदल, पालकच्या दरात सुधारणा तर लिंबाच्या आवकेत बदल

Rabi Season: रब्बीतील कृषी योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज सुरू

Dams Water Supply: चाळीसगाव, भडगावसह सहा गावांची टंचाई दूर

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज; कोणत्या भागात जोर?

Sangamner Farmer Protest: '१९७२ पेक्षा मोठा दुष्काळ, पाणी उचलण्यासाठी वीज नाही'; शेतकरी आक्रमक, संगमनेरमध्ये धडकला जनआक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT