Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : शेतात साचलेल्या पाण्यातून पिके काढण्याचे प्रयत्न सुरू

सध्या पाऊस थांबला असला तरी अनेक शिवारांमध्ये पाणी तसेच साचून आहे. यामुळे याच पाण्यातून भुईमुगासारखी पिके काढण्यासाठी शेतकरी धडपडत असल्याचे चित्र शिवारांमध्ये आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी पावसाने (Rain Update Kolhapur) विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता. २१) दुपारपर्यंत सर्वत्र ऊन व ढगाळ हवामान (Cloudy weather) होते. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे; मात्र खरीप पिकांची अवस्था (Crop Condition) अजूनही दयनीयच असून पूर्ण पाऊस थांबल्यानंतरच खरीप पिकांच्या नुकसानीचे (Crop Damage) चित्र स्पष्ट होणार आहे.

सध्या पाऊस थांबला असला तरी अनेक शिवारांमध्ये पाणी तसेच साचून आहे. यामुळे याच पाण्यातून भुईमुगासारखी पिके काढण्यासाठी शेतकरी धडपडत असल्याचे चित्र शिवारांमध्ये आहे. गुरुवारी (ता. २०) जिल्ह्याच्या पश्चिम भागातील काही गावांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला.

या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी मात्र पाऊस थाबल्याचे चित्र होते. पावसाने विश्रांती घेतली तरी यंदाचा गळीत हंगाम मात्र दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता कारखाना सूत्रांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT