Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : तापमानातील वाढ, उकाडा कायम

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळी प्रणालींमुळे राज्यात झालेले पावसाळी वातावरण निवळत आहे. दोन दिवसांपासून उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा कायम आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळी (Cyclone) प्रणालींमुळे राज्यात झालेले पावसाळी वातावरण (Rainy Climate) निवळत आहे. दोन दिवसांपासून उन्हाचा चटका (Heat) आणि वाढलेला उकाडा कायम आहे. परिणामी, राज्यातून थंडी (Cold) ओसरली आहे. आज (ता. १८) कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या तापमानाचा वाढ झाली असतानाच, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राजस्थानमधील चुरू येथे शनिवारी (ता. १७) देशाच्या सपाट भू-भागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १८) पूर्व विदर्भात पारा घसरण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात वाढलेले तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. १७) गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २५ अंशांच्या दरम्यान होते. सांताक्रूझमध्ये देशातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

पूर्व-मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) किनाऱ्यापासून दूर निघून गेली आहे. ही प्रणाली ओसरणार आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे कमी दाब क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकणार आहे.

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.३ (१७.१), जळगाव ३३.३ (१९.३), धुळे ३३ (१६.८), कोल्हापूर ३२.५ (२०), महाबळेश्‍वर २७.८ (१६.३), नाशिक ३१.५ (१८.४), निफाड ३१.६ (१७.५), सांगली ३३ (१९), सातारा ३२.९ (१८.३), सोलापूर ३४.४ (२०.४), सांताक्रूझ ३५.५(२३.४), डहाणू ३१.८ (२३.२), रत्नागिरी ३५.४ (२१.५), औरंगाबाद ३१.६ (१६.७), नांदेड ३२ (२१), परभणी ३१.८ (२०), अकोला ३३.४ (२२.१), अमरावती ३२.८ (१९.४), बुलडाणा ३३.७ (१९), ब्रह्मपुरी ३३.७ (१९), चंद्रपूर ३१ (२१), गडचिरोली ३१.४ (१५.६), गोंदिया ३१.२ (१५.८), नागपूर ३२ (१७.८), वर्धा ३३ (१९.१), यवतमाळ ३२ (१९).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

MRGS Scheme: ‘एमआरजीएस’ योजनेत पाच कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह

Freedom Of Religion Bill: धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ विधानसभेत सादर; मुस्लिम समाज लक्ष्य असल्याचा विरोधकांचा दावा

Sugar Factory Action: सोलापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर जप्तीचा प्रस्ताव

Millet Farming: कुरुलमध्ये राळा, वरई, भगरीचा प्रयोग,संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT