Parbhani News : धरणक्षेत्रात मोठा पाऊस नाही.तापमानातील वाढ, बाष्पीभवन, उपसा आदी कारणांनी परभणी जिल्ह्यामध्ये लाभक्षेत्र असलेल्या इतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे.
सोमवारी (ता. १०) सकाळी ८ वाजता जायकवाडी धरणामध्ये २६.९३ टक्के, येलदरी धरणात ५५.४८ टक्के, निम्न दुधना धरणात २५.६५ टक्के, माजलगाव धरणात १६.०३ टक्के जिवंत पाणीसाठा होता.
यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलाशयामध्ये पाण्याची येवा अत्यंत कमी आहे. अनेक धरणाच्या पाणलोटात पाऊस नसल्यामुळे अजिबात येवा नाही. परभणी जिल्ह्यात पैठण येथील जायकवाडी धरण तसेच माजलगाव धरणाच्या कालव्यांचे लाभक्षेत्र आहे.
जायकवाडी धरणामध्ये यंदा १ जून पासून ४३.८१८ एमएमक्युब येवा झाला तर १.०४१ एमएमक्युब विसर्ग झाला. सोमवारी (ता. १०) सकाळी आठ वाजता ५८४.६३७ एमएमक्युब (२६.९३ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. यंदा डाव्या व उजव्या कालव्याच्या आवर्तनाचा कालावधी गतवर्षीपेक्षा अधिक राहिला.
डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यात उशिरा पर्यंत आवर्तन सुरु राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. ऊस तसेच इतर पिकांना पाणी दिले.
परभणी-हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये सोमवारी (ता. १०) सकाळी ४४९.२४० एमएमक्युब (५५.४८ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. येलदरी धरणाच्या जलाशयातून जिंतूर साठी ०.००७ एमएमक्युब, परभणी साठी०.०४० एमएमक्युब, सेनगाव साठी०.००२ एमएमक्युब पाणीपुरवठा सुरु आहे. सिद्धेश्वर (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) धरणामध्ये जिवंत पाणीसाठा उपलब्ध नव्हता.
सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणामध्ये ६२ .१३४ एमएमक्युब (२५.६५ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये ५० एमएमक्युब (१६.०३ टक्के) जिवंत पाणीसाठा होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.