Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Traditional Agriculture : पैशांअभावी पारंपरिक शेतीपद्धतीवरच गुजराण

शेतीमध्ये सुधारणांसाठी पैशाची गरज भासते. मात्र आमची परिस्थिती पाहता बँका आम्हाला कर्जासाठी उभ्याच करीत नाहीत. त्यामुळे पारंपरिक शेतीपद्धती व त्यातून होणारे थोडेफार उत्पन्न याच भरवशावर आमची गुजराण चालते.

टीम ॲग्रोवन

अमरावती : ‘शेतीमध्ये सुधारणांसाठी पैशाची गरज भासते. मात्र आमची परिस्थिती पाहता बँका आम्हाला कर्जासाठी (Agriculture Loan) उभ्याच करीत नाहीत. त्यामुळे पारंपरिक शेतीपद्धती (Dependency On Traditional Agriculture) व त्यातून होणारे थोडेफार उत्पन्न याच भरवशावर आमची गुजराण चालते. त्यामुळे आमची परिस्थिती आजवर बदलली नाही, अशा शब्दांत आदिवासी शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या.

शासनाकडून ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ अभियान ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात करण्यासाठी सत्तार बुधवारी (ता.३१) मेळघाटात दाखल झाले. चुन्नीलाल पटेल यांच्या घरी त्यांनी जेवण केले. सुनील धांडे यांच्या घरी त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘पैसा नसल्याने पारंपरिक पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच कुटुंबाच्या गरजा भागवाव्या लागतात. या भागात व्यावसायिक पिके घेणे शक्य होत नाही, ’ अशा व्यथा शेतकऱ्यांनी सांगतिल्या.

स्वखर्चातून दिले शेतकऱ्याला घर

कृषिमंत्री सत्तार यांनी सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. तर शैलेंद्र सावलकर यांच्या घरी भेट देत चहा घेतला. धांडे आणि सावलकर यांचे घर गळत असल्याचे त्यांनी पाहिले. या दोघांनाही नवे घर बांधून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर गुरुवारी सकाळीच कंत्राटदाराला गावात बोलाविण्यात आले. घर बांधकामासाठीचे साहित्यही तडकाफडकी मागविले. त्यानंतर घराचे भूमिपूजन करून त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. दोन बेडरूम, हॉल, किचन व स्वच्छतागृह याप्रमाणे हे बांधकाम केले जाईल. त्यावर होणारा खर्च सत्तार स्वतः करणार आहेत. इतकंच नव्हे तर त्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला येण्याचा शब्दही कृषिमंत्र्यांनी या वेळी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT