Parbhani Rain Agrowon
ताज्या बातम्या

Interculture Operation : सततच्या पावसामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली

Parbhani Rain Update : परभणी हिंगोली जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांत एकूण ८२ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी हिंगोली जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांत एकूण ८२ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात सरासरी १३.४ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १४ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासून या जिल्ह्यांतील अनेक मंडलांत सततच्या पावसामुळे ओढे, नाले‌ दुथडी भरून वाहिले.

पूर्णा कयाधू नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी शिरल्याने नुकत्याच उगवलेल्या तसेच वाढीच्या अवस्थेतील पिकांचे नुकसान झाले. आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. तणांची वाढ झाली आहे. पिकांची वाढ खुंटली, पिके पिवळी पडत आहेत.

परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ५२ मंडलांत अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला. मंगळवारी (ता. २५) रात्री पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर राहिला.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३.४ मिमी तर जुलै मध्ये आजवर एकूण सरासरी १९१.३ मिमी, तर यंदा १ जूनपासून एकूण सरासरी २४६ मिलिमीटर (७५ टक्के) पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडलांत पावसाचा जोर राहिला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३ मिलीमीटर तर जुलैमध्ये आजवर एकूण ३१८.७ मिलीमीटर, तर यंदा १ जूनपासून एकूण सरासरी ३६३.८ मिलिमीटर (१००.७ टक्के) पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Berseem Fodder: रब्बीसाठी बरसीम उत्तम चारा पीक! दीड महिन्यात पहिली कापणी, एकूण ४ ते ५ कापण्या

Drought Relief Cell: जालन्यात दुष्काळ निवारण कक्ष स्थापन

Sugarcane FRP: साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना; कर्जाच्या रकमेतून थकीत एफआरपी देणे बंधनकारक, काय आहेत निकष?

Village Development Plan Letter: सरपंच, ग्रामस्थांना अनावृत्त पत्र

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT