Orange Market Agrowon
ताज्या बातम्या

Orange Market : गारपीटीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पिकण्यापूर्वीच संत्रा आणला बाजारात

अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे नागपूरमधील बाजारात शेतकऱ्यांनी पिकण्याआधिच संत्रा फळे विक्रीसाठी आणली आहेत.

Team Agrowon

Orange Market Update गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटी (Hailstorm) पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Orchard Crop Damage) झाले आहे.

त्यातच मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपीटीसहवादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी पिकण्यापूर्वीच फळं बाजारात विक्रीसाठी आणली आहेत.

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेत भागात रब्बीची पिके काढणीला आली आहेत.

अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे नागपूरमधील बाजारात शेतकऱ्यांनी पिकण्याआधिच संत्रा फळे विक्रीसाठी आणली आहेत. त्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून संत्र्याच्या दरात घसरण झाली आहे.

एकीककडे गारपीट आणि अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. या भीतीपोटी शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी पिकण्याआधिच फळे बाजारात विक्रीसाठी आणल्याचे चित्र आहे.

सध्या गारपीट आणि अवकाळी पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे आम्ही हा माल लवकरात लवकर विक्रीसाठी आणल्याचे शेतकरी सांगत आहेत.

परंतु गारपीटीमुळे जर नुकसान झाले तर सरकारही आम्हाला याची भरीव भरपाई देणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

त्यामुळेच आम्ही बागेतील संत्रा आम्ही तोडून बाजारात आणल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT